EXPORT KATWAL (SPINY GOURD)
Health Benifits : या भाजीत आहेत 20 पेक्षा जास्त पोषक तत्त्वं, खाल तर निरोगी राहाल...
या भाजीचं नाव आहे कंटोळा ( katwal) . ही भाजी पोषक तत्त्वांनी खच्चून भारलीये असं म्हंटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही. आपल्याला ही भाजी मुख्यत्वे पावसाळ्यातच पाहायला मिळते. या भाजीत प्रोटिन्स, कार्ब्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, झिंक, कॉपर, फायबर आणि सोबत व्हिटॅमिन A, B1, B2, B3, B5, B6, B9, B12,व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D 2 आणि 3, व्हिटॅमिन H, व्हिटॅमिन K होतो. आपल्या शरीराला यापासून प्रचंड फायदा होतो. खास पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांपैकी एक अशी ही भाजी आहे.
कोणत्या रोगांवर आहे फायदेशीर?
या भाजीमध्ये नेमकी कोणती पोषक तत्त्वे आहेत हे आपल्याला समजलं. आता जाणून घेऊयात या भाजीचा आहारात समावेश केल्यास कोणत्या आजारांवर ही भाजी गुणकारी राहू शकते याबाबत. तुम्हाला पोटदुखी, डोकेदुखी, हाय ब्लड प्रेशर, मूळव्याध, डायबिटीस असेल तर अशांनी ही भाजी खाणं फायद्याचं राहू शकतं. सोबतच सर्पदंश किंवा लकवा मारला असेल तरीही या भाजीच्या सेवनाने फायदा होऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे या झाडाची मुळे, पानं आणि फुलांचा आयुर्वेदात (Use in Ayurveda ) वापर केला जातो.
No comments:
Post a Comment